22 November 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

आम्हाला कमळाने फसवले! कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका: मराठा क्रांती मोर्चा

BJP, Devendra Fadanvis, Maratha Kranti Morcha

मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आणि उमेदवार निश्चितीला वेग आलेला असताना भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. कारण मराठा क्रांती मोर्चाने देखील लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे, असे सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मराठा समाजावर अन्यायच केला, असे क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अस्ट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यातील आरक्षणाची मागणी वगळता अन्य मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी हे प्रकरण सध्या कोर्टात रखडले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा थेट इशाराच मराठा संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या मोर्चे काढून काही सुद्धा हाताला लागणार नाही, केवळ राजकीय दबाव आणणे हीच आमची मुख्य भूमिका असून प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली, अशी टीका या बैठकीत करण्यात आली. आम्हाला कमळाने फसवले, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x