15 April 2025 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

भेट झाली | अमरिंदर सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

Captain Amarinder Singh

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर | पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

Since the resignation of the Punjab CM, there have been rumors that Captain Amarinder Singh will leave the Congress party. Amarinder Singh on Wednesday arrived at his Delhi residence to meet Union Home Minister Amit Shah :

गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला दाखल झाल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अमरिंदर सिंग मंगळवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत आणि ते कालच अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र नवज्योतसिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खळबळ माजली. त्यानंतर काँग्रेस मंत्रिमंडळातील चार सदस्यांनी राजीनामा देत आपली नाराजी जाहीर केली. या सर्व घडामोडींमुळे शाह आणि सिंग यांची भेट पुढे ढकलण्यात आली. मात्र काल अमरिंदर सिंग यांनी आपण अमित शाह यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करून दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आल्याचे सांगितले होते. मात्र आज कॅप्टन व शाह यांच्या भेटीने ते लवकरच भाजपवासी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केंद्रीय कृषीमंत्री पद मिळण्याची शक्यता:
अमरिंदर सिंग लवकरच काँग्रेसला रामराम करून हाती कमळ घेऊ शकतात. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे कॅप्टन सिंग यांना कृषिमंत्री पद मिळाल्यास शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात त्यांची कसोटी लागू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Captain Amarinder Singh meet Amit Shah at Delhi over Punjab political crisis.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या