2 February 2025 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB Bonus Share News | जबरदस्त संधी, ही कंपनी 1 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार, फायदा घ्या - BSE: 512008
x

अमित शहांची अडचण वाढणार, सीबीआयच्या निर्णयाला आव्हान.

मुंबई : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांची सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून मुक्तता झाली त्याला आव्हान न देण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकील संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यस्थानचे पोलीस उपनिरीक्षक हिमांशू सिंह, श्यामसिंह चरण आणि वरिष्ठ गुजरात पोलीस अधिकारी एन. के. अमीन यांची सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने सर्व आरोपातून मुक्तता केली. परंतु केवळ अमित शाह वगळून काही जणांच्या आरोप मुक्ततेला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु सीबीआयचा हा निर्णय पक्षपाती असून त्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हा खटला सोहराबुद्दीन खटल्याची सुनावणी चालू असतानाच सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजमोहन लोया यांचा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये अचानक मृत्यू झाला होता. परंतु हे सर्व प्रकरण संशयाच्या भवऱ्यात अडकले आणि ह्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका पूर्वीच दाखल झालेल्या आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x