23 November 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
x

भाजप-सेनेला स्वतःची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची वेळ का आली आहे?

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत ५ महिन्यापासून कचराकोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने साठलेला कचरा कुजल्याने रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु अनेक महिन्यापासून हा प्रश्न जटील होत चालल्याने नागरिकांमध्ये सुद्धा रोष वाढत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या संघर्षात जनतेची होरपळ होत असल्याने मुंख्यमंत्र्यांवरील दबाव वाढत आहे.

परिणामी औरंगाबाद महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर स्वतःची सत्ता असलेली महानगर पालिका बरखास्तीपर्यंतची तंबी देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे. कारण तसा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांना दिला आहे. जर प्रशासनाकडून प्रश्‍न सुटत नसेल तर महापालिकाच बरखास्त करतो अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिल्याने सर्वाधिक कोंडी शिवसेनेची झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनी आयुक्तांना कचरा कधी संपणार याचा रोडमॅप तयार आहे का? निविदा प्रक्रिया कधी संपणार? कचऱ्यावर प्रक्रिया कधीपासून सुरू होणार? अशा एकावर एक प्रश्‍नांचा भडीमार केला. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? एवढे दिवस काय केले? दोन दिवसात रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिले गेले. परंतु वेळेवर कामे होत नसतील तर महापालिकाच बरखास्त करून टाकतो अशी थेट तंबी पालिका आयुक्तांना देण्यात आली.

औरंगाबाद महापालिका शिवसेनेसाठी एक शक्तिस्थळ आहे. वास्तविक महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेकडे महापौर पद आहे. परंतु बैठकीदरम्यान एम.आय.एम चे आमदार इम्तियाज जलील यांनी कचऱ्याच्या टेंडर’मध्ये सत्त्ताधारी शिवसेना नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x