5 February 2025 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या
x

Chipi Airport Inauguration | चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर राणे ३ नंबरला | विनायक राऊत म्हणाले..

Chipi Airport Inauguration

कणकवली, ०१ ऑक्टोबर | चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण (Chipi Airport Inauguration) पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याचं वृत्त आहे. निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याच्या राणेंचा सूर आहे. यावरुनच शिवसेनेने राणेंवर निशाणा साधलाय. शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केलीय. तीन नंबरच्या स्थानावरून रणकंदन करतील तर त्याचं ते अज्ञान आहे. त्यांनी चांगला गुरु ठेवावा, चांगले मागदर्शन घ्यावं”, असा निशाणा खासदार विनायक राऊत यांनी साधला आहे.

It is reported that Union Minister Narayan Rane is upset over the Chipi Airport Inauguration leaflet. Narayan Rane’s name is number three on the invitation card. Due to this, Shiv Sena has targeted Rane :

दरम्यान, कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तर तिसऱ्या क्रमांकावर नारायण राणे यांचं नाव आहे. चिपी विमानतळावरुन शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. त्यात कार्यक्रमात पत्रिकेत राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर असल्याने राणे रुसल्याची चर्चा आहे. यावरच खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधलाय.

केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कुठे कोण आहे, तीन नंबरच्या स्थानावरून उहापोह करतील तर त्यांचं ते अज्ञान आहे. त्यांना नेमकं कळत नाही की शासनाचा प्रोटोकॉल काय आहे, त्यांनी चांगला गुरू करावा म्हणजे त्यांना चांगले मागदर्शन मिळेल”, असा खोचक टोला विनायक राऊतांनी राणेंना लगावला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Chipi Airport Inauguration program Shivsena MP Vinayak Raut target union minister Narayan Rane.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x