15 January 2025 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

'चौकीदार ही चोर है' असं आता संरक्षण मंत्रालय सुद्धा म्हणतंय: राहुल गांधी

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमानांच्या करारात पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप केला. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी सुरु केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत थेट वाटाघाटी केल्यानं भारतीय संरक्षण मंत्रालयाची बाजू कमकुवत झाली, असं वृत्त आज ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आणि त्यानंतर खळबळ माजली आहे.

त्याचाच धागा पकडून राहुल गांधींनी मोदींना पुन्हा लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. सदर प्रकरणी भारतीय संरक्षण मंत्रालयानं सुद्धा पंतप्रधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. कारण, राफेल लढाऊ विमानांच्या करारासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाची फ्रान्स सरकारसोबत बोलणी सुरू होती. परंतु, स्वतः पंतप्रधान कार्यालयानं त्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केला. त्यामुळे त्याचा फायदा थेट फ्रान्सलाच झाला. पीएमओ’कडून करण्यात आलेल्या त्या हस्तक्षेपाचा आणि समांतर वाटाघाटींचा संरक्षण मंत्रालयानं निषेध सुद्धा नोंदवला होता, असं वृत्त ‘द हिंदू’नं आज प्रसिद्ध केलं.

दरम्यान, पंतप्रधान अनिल अंबानींसाठी काम करतात. मोदींच्या थेट हस्तक्षेपामुळे संरक्षण मंत्रालयाकडून सुरू झालेल्या बोलणीवर तसेच वाटाघाटींवर थेट परिणाम झाला, असा स्पष्ट आरोप काँग्रेस अध्यक्षांनी केला. दरम्यान, फ्रान्सचे माजी पंतप्रधान ओलांद यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना चोर म्हटलं आणि आता भारतीय संरक्षण मंत्रालय मोदींना चोर म्हणतंय, अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले आहेत.

तसेच कालच काँग्रेस देशाच्या हवाई दलाला कमजोर करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधानांनी संसदेत केला होता. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘संरक्षण मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपाचा निषेध केला आहे. त्यात आमचा किंवा काँग्रेसचा संबंध येतोच कुठे?, असा प्रतिप्रश्न राहुल यांनी यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मोदींनी भारतीय हवाई दलाचे ३०,००० कोटी रुपये उचलून अनिल अंबानींना दिले. त्यामुळे देशाच्या हवाई दलाचं नुकसान झालं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x