16 January 2025 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी . Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
x

मातोश्रीवर फडणवीसांची युतीबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी काल रात्री मातोश्रीवर जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, सदर बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भारतीय जनता पक्ष २५ तर शिवसेना एकूण २३ जागा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, प्रकृती स्वास्त्य ठीक नसल्याने फडणवीसांनी कालचा वाशिमचा दौरा देखील रद्द केला आणि तसेच मुंबईला परतले. त्यानंतर रात्री उशिरा मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती. आज मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जात आगामी युतीबाबतची घोषणा लवकरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यानंतर माध्यमांना दिले.

काही करून सेना भाजप युतीचा मार्ग मोकळा करा, असा अमित शाहांकडून महाराष्ट्र भाजपला अंतिम संदेश धाडण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x