13 January 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा
x

'पाणी अडवा, पाणी जिरवा’ घोषनेच ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ झाल्याने गावांचा विकास रखडला

पुणे : आज पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान राज ठाकरे यांनी पाण्याबद्दलची जनजागृती जर अमीर खान पार पडणार असेल तर सरकार नक्की काय करत असा प्रश्न उपस्थित केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिउत्तर दिल आहे. उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की,’मागील काही वर्षापूर्वी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची अशी घोषणा देण्यात आली होती. त्यातून जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. परंतु, ग्रामीण भागातील गावागावात गट-तट, धर्म-जात अशा विषयांमुळे ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ असं होऊ लागलं. तसेच गावातील या कुरघोड्यांमुळे गावांचा खरा विकास रखडला आहे.

परंतु लोकचळवळ शिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. गावागावांमधील गट-तट, जात-पात तसेच राजकीय पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहण्यात अडचणी येतात. नेमकी हीच गोष्ट पानी फाऊंडेशन ने हेरली आणि त्यावर काम सुरु केले. पुढे फडणवीस असे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचं सैन्य होतं. महाराजांनी सर्वांना सोबत घेऊनच स्वराज्याची स्थापन केली होती. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केलं आणि गावातल्या लहान असलेल्या माणसांनी मोठं काम करून परिवर्तन केलं असं प्रशस्ती पत्र सुद्धा दिल.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x