24 January 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी 1 शेअर वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: REDTAPE Property Rights | 90% पुरुष मंडळींना माहित नाही, मुलींना लग्नानंतर वडिलांची संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा IREDA Share Price | इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA 8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO
x

नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली, मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली असल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.

आगामी निवडणुकीत सुद्धा भाजपला याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात अशी शक्यता निर्माण झाल्याने भाजपने नाशिककरांच्या रोषापुढे शरणागती पत्करल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषक बोलत आहेत. नाशिक महापालिकेतील ज्या करवाढीचा मुद्दा पुढे रेटत तुकाराम मुंढेंच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता, त्यात आयुक्तांनी सुद्धा काही अंशी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

परंतु जनतेचा रोष पाहता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्थानिक भाजप नगरसेवकांना चांगलाच धक्का दिल्याने, आज येणारा अविश्वास प्रस्ताव भाजपला मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे बासनात गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील हा संघर्ष क्षमण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x