17 April 2025 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

खळबळ, काही राजकारण्यांविरोधात ठरवून नकारात्मक बातम्यांचा 'सौदा' ? कोब्रापोस्ट

नवी दिल्ली : देशातील प्रमुख १७ प्रसिद्ध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र समूहातील अधिकाऱ्यांची कोब्रापोस्ट’ कडून स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोल-खोल करण्यात आल्याचा दावा ‘कोब्रापोस्ट’ या शोधपत्रकारिता करणाऱ्या समूहाने केल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे त्यात डीएनए, दैनिक जागरण, इंडिया टीव्ही, अमर उजाला आणि स्कूपव्हूप अशा दिग्गज कंपन्याचे प्रतिनिधी ‘कोब्रापोस्ट’ ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले असल्याचा दावा केला आहे.

‘ऑपरेशन १३६’ असं या मिशनला कोब्रापोस्ट शोधपत्रकारिता समूहाकडून नाव देण्यात आलं होत. त्याच ‘ऑपरेशन १३६’ चा पहिला भाग सोमवारी सार्वजनिक करण्यात आला. त्यामध्ये कोब्रापोस्ट शोधपत्रकारिता समूहातील पत्रकार पुष्प शर्मा यांनी ‘आचार्य अटल’ असं नाव बदलून अनेक टीव्ही वृत्तवाहिन्या आणि वृत्त समूहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी संपर्क साधताना त्यांनी स्वतःचा संबंध उजैन स्थित एका आश्रमाशी असल्याचे सांगितले होते.

‘ऑपरेशन १३६’ मध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ देशातील १७ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘मवाळ हिंदुत्वाचा’ मुद्दा रेटून धरण्याची तयारी दर्शविली. त्या मोबदल्यात त्यांनी पैसे घेऊन तशा बातम्या देण्याची ऑफर सुद्धा स्वीकारली. फक्त या आपसातील व्यवहाराची कोणतीही पावती दिली जाणार नव्हती. देशातील प्रतिष्टीत राजकारण्यांविरोधात ठरवून नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारी या सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे पत्रकारांनी दर्शविली. त्यात राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, अरुण जेटली, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा, मेनका गांधी तसेच वरून गांधी यांची ठरवून नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली. त्यामुळे ‘ऑपरेशन १३६’ ने देशभरात खळबळ उडाली आहे.

एका दुसऱ्या नामांकित वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी जेव्हा दैनिक जागरणच्या प्रतिनिधींशी ‘ऑपरेशन १३६’ बद्दल संपर्क साधला असता त्यांनी कोब्रापोस्टचे हे आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर त्या व्हिडीओच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे. तसेच जर हा व्हिडीओ खरा असेल आणि त्यात तथ्य असेल आम्ही नक्कीच संबंधितांवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच इंडिया टीव्ही ने सुद्धा सर्व आरोप फेटाळले असून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यामुळे ‘ऑपरेशन १३६’ च्या दुसऱ्या भागात अजून कोणाची नवे बाहेर येणार ते कोब्रापोस्टच्या पुढच्या पत्रकार परिषदेत उघड होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या