24 January 2025 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

इथे गुजरातमधील लोकं देवाच्या भरोसे हे हायकोर्ट सांगतंय | तर या नेत्याचं मोदींना महाराष्ट्रात आणीबाणीसाठी पत्रं

Congress former MLA Ashish Deshmukh

नागपूर, २१ एप्रिल: काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.

आशिष देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे.

आशिष देशमुख यांनी मोदींना पत्रं लिहून महाराष्ट्रातील आणीबाणी संदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती केली असली असली तरी त्यांना गुजरातमध्ये आरोग्य यंत्रणेवरून आणीबाणी सदृश्य स्थिती झाल्याने हायकोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या याची माहिती नसावी असं दिसतंय. गेल्या रविवारी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली होती. या याचिकेवर १२ एप्रिलला सुनावणी झाली होती. त्यावेळी गुजरातमधील लोकं सध्या देवाच्या भरोसे असल्याचं गुजरात हायकोर्टाने म्हटलं होतं. इथे गुजरात देवाच्या भरोसे आणि आरोग्य व्यवस्थेवरून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने याचिका होतं असताना काँग्रेसच्या माजी आमदाराने केलेली मागणी हास्यास्पद म्हटलं आहे.

 

News English Summary: Congress MLA Ashish Deshmukh has criticized the Thackeray government’s ongoing efforts to curb Corona. Also, Ashish Deshmukh has written a letter to Prime Minister Narendra Modi saying that the efforts being made by the state government to stop Corona are insufficient. In the letter, Ashish Deshmukh has demanded a health and financial emergency in the state.

News English Title: Congress former MLA Ashish Deshmukh wrote a letter to PM Narendra Modi over Maharashtra corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x