15 April 2025 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

कोणीही टाळी वाजवली नाही | चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या UNGA'च्या भाषणावर टोला

P Chidambaram

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले, त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा हा शेवटचा दिवस होता. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या या अभिभाषणाला देशाला गौरवान्नित करणारे असल्याचे म्हटले आहे, तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टोमणा मारला आहे. यासोबतच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पीएम मोदींच्या वक्तव्याच्या बहाण्याने यूपी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना घेरले आहे.

I was disappointed that only a few seats were occupied when PM Modi addressed the U N General Assembly And even more disappointed that no one applauded said P Chidambaram :

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांनी ट्विट केले की, पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणादरम्यान काही जागाच भरलेल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत, असेही ते म्हणाले. चिदंबरम यांनी ट्वीट केले की, ‘जेव्हा पीएम मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले, तेव्हा मी खूप निराश झालो की, फक्त काही जागा भरल्या गेल्या. कोणीही टाळ्या वाजवत नसल्याने ते आणखी निराशाजनक होते. त्यांनी लिहिले की, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मिशन विस्कळीत झाले.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “UNGA मध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी भारताला सर्व लोकशाहीची जननी म्हटले आहे, मला आशा आहे की, योगीजी (यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि हिमंत बिस्वा शर्मा (आसामचे मुख्यमंत्री) ऐकत असतील.”

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पीएम मोदी पाकिस्तान आणि पाक पीएम इम्रान खान यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल बरेच काही बोलले. पीएम मोदी म्हणाले की, जो कोणी दहशतवादाचा वापर करत आहे, त्यांनाही हे समजले पाहिजे की हा त्यांच्यासाठी तितकाच मोठा धोका आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपणही सावध राहण्याची गरज आहे की, कोणत्याही देशाने तिथल्या नाजूक परिस्थितीचा वापर आपल्या स्वार्थासाठी साधन म्हणून करू नये.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Congress leader P Chidambaram comment PM Narendra Modi UNGA speech.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या