5 November 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER
x

नाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईत : कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला असलेला विरोध म्हणजे कोकणवासीयांची एक दिशाभूल असून शिवसेनेची तशी ‘डील’च भाजप बरोबर झाली आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

त्याविषयी सविस्तर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुळात केंद्र सरकारला नाणार प्रकल्प गुजरातला वळवायचा आहे. पण जण युतीच्या काळात जर हा प्रकल्प गुजरातला गेला तर त्याचे पाप आपल्या माथी यायला नको म्हणून भाजपने मित्र पक्ष शिवसेनेशी ‘डील’ केली आहे. त्यांच्या ‘डील’चाच भाग म्हणजे नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध दाखवायचा आणि भाजपने असं दाखवायचं की, आम्ही जनमताचा आदर करून हा प्रकल्प रद्द करत आहोत असं दाखयचं आधीच ठरलेलं आहे असा थेट आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

सेनेचे उद्योग मंत्री विधानसभेत सांगतात प्रकल्प रद्द केला आणि त्यांचाच सत्ताधारी मित्र पक्ष भाजप नाणार रिफायनरी प्रकल्पाला वेगवेगळ्या मान्यता देतात. त्यामुळे भाजप – शिवसेना कोकणातील जनतेला मूर्ख बनवत आहेत असं विधान करत विखे-पाटलांनी युती सरकारवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x