21 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
x

शिवसेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे: विखे पाटील

मुंबई : सध्याची शिवसेनेची अवस्था ही वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणा-या सौभाग्यवतीसारखी झाली आहे. केवळ सत्तेतला संसार टिकविण्यासाठी शिवसेना सर्व अपमान गिळत आहे. भाजपचा प्राण याच शिवसेनारूपी सावित्रीमुळे टिकून आहे. त्यामुळे शिवसेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना भाजपच्या युती सरकारवर केली आहे.

सध्या नागपूर येथे अधिवेशनाला सुरु झालं असून त्यासंबंधित सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी शिवसेना भाजपच्या युती सरकारवर बोचरी टीका केली आहे. विरोधकांच्या या पत्रकार परिषदेला विखे पाटील यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, पीरिपाचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील तटकरे, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. शरद रणपिसे, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

सरकार वर चौफेर टीका करताना विरोधकांनी शिवसेनेला विशेष लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाणार प्रकल्प तसेच धनगर आरक्षण, मराठा आरक्षण अशा अनेक महत्वाच्या विषयांना विरोधकांनी हात घातला आहे. त्यामुळे हे अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे शिवसेना आता विरोधकांच्या या बोचऱ्या टीकेला काय उत्तर देणार ते पाहावं लागेल.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x