24 December 2024 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

भाजप आमदाराच्या गाडीत EVM मशीन सापडली | निवडणूक आयोग भाजपला मदत करतंय का? - अतुल लोंढे

Congress spokesperson Atul Londhe, Assam Assembly Election, EVM, BJP leaders vehicle

मुंबई, ०२ एप्रिल: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.

दरम्यान, आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे सरकार पुरस्कृत वृत्त वाहिन्या आणि निवडणूक अयोग्य हास्यास्पद कारणं देत असल्याने समाज माध्यमांवर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष केलं आहे. यासंदर्भात अतुल लोंढे यांनी प्रश्न उपस्थित करताना ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “भाजप आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडली आहे आणि कोणतीही कारवाई न होता निवडणूक आयोग भाजपला बेकायदेशीर मार्गाने मदत करत आहे का?

 

 

News English Summary: Following this issue, Congress spokesperson Atul Londhe has drawn the attention of the Modi government and the Election Commission. In this regard, Atul Londhe, while presenting the question, said in his tweet, “EVM machine has been found in the car of a BJP MLA and without any action, is the Election Commission helping the BJP illegally?” said Atul Londhe.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe raised question over Assam EVM found in BJP leaders vehicle news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x