17 April 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

सीबीआयच्या अहवालात देशमुखांविरोधात एकही पुरावा सापडला नाही, तरी CBI कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?

Anil Deshmukh

मुंबई, २९ ऑगस्ट | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय.

सीबीआयच्या अहवालात देशमुखांविरोधात एकही पुरावा सापडला नाही, तरी CBI कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर? – Congress spokesperson Sachin Sawant criticize Modi government over CBI report clean cheat to Anil Deshmukh :

तसेच हे सर्व अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीला बदनाम करण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप करत याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी सचिन सावंत यांनी केलीय. सावंत पुढे म्हणाले, “अनिल देशमुख आणि मविआला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित 100 कोटी रुपये वसुली आरोपात अनिल देशमुख यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती.

तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असंही सचिन सावंत यांनी सांगितलं. यावेळी सचिन सावंत यांनी या सर्व प्रकाराचा जाहीर निषेधही केलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  Congress spokesperson Sachin Sawant criticize Modi government over CBI report clean cheat to Anil Deshmukh.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या