15 January 2025 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

ED, CBI'ने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का? | तक्रारी करा, पण चौकशी सुद्धा भाजपाच करणार का? - सचिन सावंत

Sachin Sawant

मुंबई, २० सप्टेंबर | शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात आहे.

ED, CBI’ने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का?, तक्रारी करा पण चौकशी सुद्धा भाजपाच करणार का? – Congress spokesperson Sachin Sawant target Kirit Somaiya over statement regarding exposing 2 congress leaders :

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

याच विषयाला अनुसरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं की, ‘त्यामुळे सोमय्या व पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन म्हणून जनता पाहत आहे. ईडी, सीबीआयने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का? तक्रारी करायच्या तर करा पण चौकशीचे काम ही भाजपाच करणार का? काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर फुसक्या लवंग्या नको दमदार करा! नौटंकीला जशास तसे उत्तर देऊ!

चंद्रकांत पाटील यांनाही टोला:
मात्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं की, ‘काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार काढणार या नवीन भविष्यवाणीआधी, ७२ तासात “माजी”चे “आजी” मंत्री होणार या चंद्रकांत पाटील यांच्या भविष्यवाणीचे काय झाले? देशात आज कुठेच कोणाचा शपथविधी झालेला दिसत नाही. आम्ही दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात? कोविडमुळे राज्यात तसेही नाटक सिनेमा बंद आहेत

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Congress spokesperson Sachin Sawant target Kirit Somaiya over statement regarding exposing 2 congress leaders.

हॅशटॅग्स

#SachinSawant(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x