21 November 2024 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य - नाना पटोले

Nana Patole

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान केले. यावेळी रावसाहेब दानवे देखील मंचावर होते. त्यावरून आता तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य – Congress state president reply on CM Uddhav Thackeray’s statement at Aurangabad :

आघाडी सरकार आल्यापासून भाजप ताणतणावत आहे:
आघाडी सरकार आल्यापासून भाजप ताणतणावत आहे. त्यामुळे भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं असेल. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे, असं कमिटमेंट आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिले आहे. त्यामुळे आमचं सरकार देखील स्थिर आहे. पण, उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असेही नाना पटाले म्हणाले. ‘माजी मंत्री म्हणू नका’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटलांना दिवस स्वप्न पडले असावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केलं.

नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर:
आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे देखील समजले होते. याबाबतही पटोले यांनी माहिती दिली. के. सी. वेणुगोपाल यांना संघटनात्मक कामकाजाची माहिती देण्यासाठी आलो आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यात वेगवेगळे प्रश्न घेऊन जाणार आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Congress state president reply on CM Uddhav Thackeray’s statement at Aurangabad.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x