21 January 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

२०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल: शरद पवार

सातारा : भाजपचा मागील ४ वर्षातील कारभार बघता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोणाला नक्की किती जागा मिळतील किंव्हा सरकार बनेल की नाही हे सध्या सांगण कठीण असलं तरी २०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार म्हणाले.

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ५९ वी पुण्यतिथी असल्याने शरद पवारांची विशेष उपस्थिती होती. २०१९ मधील निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अन्य पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस सोबतच्या आघाडीबाबत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, ‘राज्यासह केंद्रात काँग्रेससोबत एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. सध्या राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी देशातील अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व अजून कायम आहे, ते आपण मान्य केले पाहिजे असं मत त्यांनी नोंदवलं.

भाजप कृषी संशोधन केंद्रांतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भाजप सरकार भरत नाहीत यावर शरद पवारांनी नेमकं बोट ठेवलं. तसेच राज्यात अनेक संस्थांना प्रमुख नेमलेच नाहीत असं पवार म्हणाले. तसेच देशाच्या संसदीय लोकशाहीत लोकांच्या मनातील संशय दूर करणे हे भारताच्या निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावले तरच ते लोकशाहीच्या हिताचे असेल असं मत निवडणूक आयोगाच्या भुमिकेबाबत बोलताना पवार यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केलं.

तसेच महाराष्ट्रात भाजप सरकार सर्वत्र मराठीचा वापर करण्याबाबतचा परिपत्रक काढत, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत भाजप सरकार कोणत्याच हालचाली करीत नसल्याच मत पवारांनी मांडल. तसेच धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबतचे भाजपचे आश्वासन हवेतच विरळ आहे असं पवार म्हणाले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x