15 January 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Deglur Bypolls Election | सभांमधून ED, IT'च्या धमक्या देणाऱ्या चंद्रकांतदादा, फडणवीसांना मतदाराने नाकारलं | भाजपचा पराभव

Deglur bypolls election

मुंबई, 02 नोव्हेंबर | नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु झाली होती. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान (Deglur Bypolls Election) झालं होतं.

Deglur Bypolls Election. My victory is the victory of Mahavikas Aghadi. After the death of my father, I was given a lot of love by the people so I was able to get elected. I will try to fulfill my father’s dream of constituency development, said Jitesh Antapurkar :

या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तर थेट सभेतच अशोक चव्हाण यांना ED आणि आयकर विभागाच्या धमक्या देताना सामान्य लोकांच्या मूळ मुद्यांना बगल दिली होती. तोच राग इथल्या मतदाराने मतपेटीतून व्यक्त केला आहे अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.

जितेश अंतापूरकर यांनी माझा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी निवडून येऊ शकलो. मतदार संघाच्या विकासाचं माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असं जितेश अंतापूरकर म्हणाले.

देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी
सव्वीसावी फेरी 26

१. श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
97157

२. श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
59031

३. श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
10466

अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Deglur bypolls election congress candidate Jitesh Antapurkar victory.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x