30 April 2025 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका
x

शिवसेनेने आपलाच उमेदवार पळवून आपल्याच विरुद्ध उभा केला

ठाणे : ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवून आपल्यासमोरच उभा केला. तरी आपण पोटनिवडणूक जिंकली, परंतु येत्या निवडणुकीत शिवसेनेपासून सावध राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.

भाजपने नेहमीच मित्र पक्षाबरोबर मैत्री जपली आणि त्यांच्यासाठी जागा सुद्धा सोडल्या आणि त्यामुळेच कोकणात ताकद असताना सुद्धा भाजप द्वितीय क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. निरंजन डावखरे यांना किमान ६० टक्क्याहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच आवाहन केलं.

संधी मिळताच भाजपने आपली ताकद दाखविली आहे. पनवेल निवडणुकीच्या वेळी ऐन वेळेस पुन्हा मित्रपक्षाने युतीस नकार दिला. परंतु आपण आपल्या हिमतीवर लढलो आणि शिवसेनेला एकही जागा जिंकू दिली नाही आणि भाजपने एकतर्फी विजय खेचून आणला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony