15 January 2025 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

पंकज तडस आणि पूजा प्रकरण | चित्रा वाघ यांचं मौन, पण फडणवीसांचा हस्तक्षेप | काय म्हटलं?

Devendra Fadnavis

वर्धा, ०८ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं, असं सांगतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही, असा जोरदार हल्ला रुपाली चाकणकर यांनी चढवला आहे.

पंकज तडस आणि पूजा प्रकरण, चित्रा वाघ यांचं मौन, पण फडणवीसांचा हस्तक्षेप – Devendra Fadnavis interfere in BJP MP Ramdas Tadas family case :

रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 6 ऑक्टोबर 202 रोजी वैदिक विवाह मंगल कार्यालय या ठिकाणी पंकज आणि पूजाने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्याकडे फक्त प्रमाणपत्रं होतं. वैदिक पद्धतीने त्यांनी विवाह केला नव्हता. म्हणून आज विवाह केला. गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी पूजाला विचित्रं वागणूक दिली आहे, तिला वेगवेगळी अमिषं दाखवून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना समोर आल्यानंतर त्यांना विवाह करावा लागतोय, असं चाकणकर म्हणाल्या.

कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत:चं वैयक्तिक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणत नाही. तिने वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहेत. विवाह प्रमाणपत्रंही माझ्याकडे आहे. तिला खूप त्रास होत होता म्हणून तिने व्हिडीओतून आपली वेदना मांडली. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागतोय. यात सुपारी वगैरे घेण्याची आम्हाला भाजप सारखी सवय नाही. त्यांच्या महिला पदाधिकारी कदाचित अशा पद्धतीने षडयंत्र रचत असतील. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहोत. ते आमचे संस्कार नाहीत. ते भाजपचे संस्कार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

चित्रा वाघ यांचं मौन, पण फडणवीसांचा हस्तक्षेप:
सदर विषयावरून भाजपच्या महिला पदाधिकारी कायद्याचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव आणि एका तरुणीचा लग्नावरून वाद सुरू आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझे तडस यांच्यासोबत बोलणे झाले असून या प्रकरणात कायद्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Devendra Fadnavis interfere in BJP MP Ramdas Tadas family case.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x