13 January 2025 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्तेवर टाच

बीड : एनसीपी’चे नेते तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भलतेच अडचणीत आले आहेत. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेंच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे धनंजय मुंडे स्वतःच न्यायालयीन कचाट्यात अडकले आहेत.

जिल्हा सत्र न्यायालयाने मुंडेंसह इतर ८ जणांविरुद्ध सुद्धा अशीच कारवाई केली आहे. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या ३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार धनंजय मुंडेंना मालमत्तांच्या विक्रीचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार यापुढे करता येणार नाही. आज जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले. तसेच न्यायालयाने बँकेतील गैरव्यवहारांप्रकरणी कडक शब्दात ताशेरे सुद्धा ओढले आहेत.

धनंजय मुंडें यांच्याशी संबंधित देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर इथल्या शेतजमिनी, अंबाजोगाई रोडवरील घर आणि संत जगमित्र सूतगिरणीचे ऑफिस अशा मालमत्तांच्या विक्रीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. बीड जिल्हा सहकारी बँकेकडून संत जगमित्र सहकारी सूतगिरणीला बेकायदेशीर कर्ज दिल्या प्रकरणी ऑक्टोबर २०१३ मध्ये परळीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ११ जुलै २०१६ रोजी परळी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे यात धनंजय मुंडे यांच्यासह आमदार अमरसिंह पंडित, सुभाष सारडा, राजाभाऊ मुंडे आणि धैर्यशील साळुंके अशा राजकीय मंडळींचा समावेश होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुडेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आगामी निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत सापडली आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x