17 April 2025 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

शिवसेनेला धक्का, अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर?

doctor Amol Kolhe, Shivsena, NCP

शिरूर : छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून एनसीपीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची वृत्त आहे. असं झाल्यास हा शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का आहे असंच मानलं जातं आहे. तसेच शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात असाही कयास व्यक्त होतो आहे. अमोल कोल्हे यांच्यासह दोन माजी आमदारांचाही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे पक्षप्रवेश करतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावळेी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे एनसीपीमध्ये प्रवेश करून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या