15 January 2025 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

नाशिकमध्ये भुजबळांची मदत एनसीपीला की सेनेला ?

नाशिक : आज विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले असून, त्यात नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना आणि भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला असताना सुद्धा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे तब्बल २०० मतांनी विजयी ठरले आहेत. परंतु आता स्वतः नरेंद्र दराडे यांनी विजयामागे एनसीपीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मदत लाभली असा दावा केला आहे.

कारण मतदानापूर्वी नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा विजय सोपा झाल्याचे चित्र होते. परंतु तसे तर्क लावले जात असताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंनी २०० मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

शिवसेनेच्या विजयाने राष्ट्रवादीला धक्का बसला खरा, पण सेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनीच आपल्या विजयामागे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मदत लाभल्याचे सांगितल्याने राजकीय विश्लेषक निरनिराळे तर्क लावू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी भुजबळ तुरुंगातून सुटल्यानंतर पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यावरूनच भुजबळांची जवळीक वाढताना दिसत होती. त्यामुळेच नरेंद्र दराडे यांनी जो दावा केला आहे तो पूर्णपणे नाकारता सुद्धा येत नाही.

राजकीय विश्लेषकांकडून असं म्हटलं जात आहे की, शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली खरी, तसेच पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल असं बोलू लागले. परंतु वास्तविक शिवसनेंकडे मुख्यमंत्रीपदाचा राज्यस्तरावरील एकही चेहरा नसून त्यामुळेच शिवसेना भुजबळांशी आणि भुजबळ शिवसेनेशी जवळीक वाढवत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीने नरेंद्र दराडेंचा हा दावा फेटाळून लावला असून उलट भाजपनेच शिवसेनेला मदत केल्याचं सांगितलं.

हॅशटॅग्स

#NCP(372)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x