21 November 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

शिवसेनेचं हिंदुत्व केवळ मतांसाठी, नेते चर्चच्या भेटीला

पालघर : सध्या पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाषांत एक मुद्दा आणि मतांसाठी पडद्याआड वेगळंच राजकारण शिजताना पहावयास मिळत आहे. त्याचाच प्रत्यय पालघर निवडणुकीत आला आहे. ज्या चिंतामण वनगांनी पालघरमधल्या पाड्या-पाड्यांवर, वस्त्या-वस्त्यांवर रा. स्व. संघ व हिंदू सेवा संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर करण्याचा वसा घेतला, त्यांच्याच मुलाला सेनेने स्वतःच्या मतलबासाठी चर्चमध्ये नेले आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाचा खरा चेहरा समोर आला आहे.

हिंदुत्वाच्या अजेंडयावर निवडणूक लढणारी शिवसेना आणि शिवसेनेचे नेते सभेत हिंदुत्वाचे रक्षणकर्ते म्हणून मोठं मोठी भाषणं देतात खरे, परंतु विषय जेंव्हा मतांचा येतो तेव्हा मात्र पडद्याआड वेगळ्याच घडामोडी घडत असतात ज्याची सभेतील हिंदूंना कल्पना सुद्धा नसावी. तसच काहीस पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घडताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे नेते त्यांच्या उमेदवाराला चर्चमध्ये नेऊन धर्मगुरूंकडून मिशनर्‍यांच्या इमान राखण्याच्या शपथा दिल्या जात आहेत.

पालघरमध्ये प्रामुख्याने वनवासी समाजाची बहुसंख्या असलेला जिल्हा असल्याने व्हॅटिकनमधल्या प्रतिनिधीच्या आदेशाने धर्मांतरासाठी मिशनर्‍यांम्हणजे जणूकाही नंदनवनच असावं. याच पालघरमध्ये आणि याच मिशनर्‍यांच्या धर्मवेडापायी पालघर, वसई व ठिकठिकाणच्या वनवासी पाड्यांवर धर्मांतर करण्याचं प्रमाण मोठ्या राजरोस पणे बोकाळल्याचे दिसते. परंतु स्वतःला ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या शिवसेनेला मात्र हा धर्मांतराचा हा बोकाळलेला प्रकार निवडणुकीमुळे दिसत नसावा. त्यामुळेच शिवसेनेत स्वतःला दिग्गच नेते म्हंणून घेणारे नेते स्वतः श्रीनिवास वनगा यांना ठिकठिकाणच्या चर्चमध्ये जाऊन तिथले पाणी शिंपडून घ्यायला सांगून आणि तिथे डोके टेकवायला सांगत आहेत. कारण प्रश्न हिंदुत्वाचा नाही तर मतांचा आहे.

कालच दिल्लीच्या आर्चबिशप अनिल कोऊटो यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आध्यात्मिक बदलांसाठी तसेच भाजपच्या पराभवासाठी प्रार्थना आणि उपवास करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन समस्त ख्रिस्ती समाजाला आणि देशातील चर्चच्या धर्मगुरूंना केले आहे. कदाचित हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला भाजप द्वेषाची नामी संधी मिळाली असावी. त्यामुळेच तो द्वेष मनात ठेऊन हिंदुत्व सुद्धा बाजूला ठेऊन या चर्च धर्मगुरूंच्या हातात हात घालून आध्यात्मिक बदलांसाठी पुढाकार घेतला की काय असच एकूण पालघर मध्ये शिवसेनेचं राजकारण सुरु आहे. एकूणच शिवसेनेच्या हिंदुत्वाचा खरा चेहरा समोर आला आहे.

असेच प्रकार संपूर्ण मुंबईमध्ये सुरु आहेत, जिथे हिंदुत्व पुढे करून मुंबईतील विविध मतदार संघात उत्तर भारतीयांचे बेधडकपणे मेळावे शिवसेना भरवताना दिसत आहे. मराठी माणूस आणि त्याची मत पारंपरिक समजून हिंदुत्व पुढे करायचं आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांकडे मतांचा जोगवा मागायचा हे प्रयोग शिवसेनेकडून गल्लो गल्ली पाहावयास मिळत आहेत. थोडक्यात बोलायचं तर ना धड मराठी या मुद्यावर ठाम, ना हिंदुत्व असं काहीस पालघर आणि मुंबईतील शिवसेनेचं चित्र पाहिल्यास अनुभवास येत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x