18 January 2025 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

शरद पवारांनी ईडीचा सामना केला | भाजपचं काम ED करतंय - जयंत पाटील

Minister Jayant Patil

परळी, २८ सप्टेंबर | लोकांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील परळीत बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेली बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

Sharad Pawar faced ED. Today he is two years old. ED is doing the work of BJP. As Namdev Aghav and leaders came from BJP, many from NCP are coming back said minister Jayant Patil :

सरकार पाडण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स:

पुढे जयंत पाटील म्हणाले की, “शरद पवारांनी ईडीचा सामना केला. आज त्याला दोन वर्षे झाली. भाजपचं काम ईडी करत आहे. भाजपमधून नामदेव आघाव आणि नेते आले तसे असंख्य राष्ट्रवादीतून गेलेले परत येत आहेत. बीडमध्ये पाऊस जास्त पडला, पुढच्या आठवड्यापर्यंत मदत मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स मागे लावत आहेत, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी भाजपवर केला. सगळ्या केंद्रीय एजन्सी सरकार पाडण्यासाठी वापरत असाल तर इंदिरा गांधी होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

सोयाबीनचा दर 11 हजार होता मात्र मोदी साहेबांमुळे चार हजारावर आले. श्रीमंत माणसाचे चोचले पुरवितात गरिबांची किंमत नाही. दोन विमान खरेदी करणार आहे. मोदींची इच्छा आहे म्हणून घर नवीन बांधत आहेत. जे भक्कम आहे. राज्याच्या मदतीला केंद्र आले पाहिजे, ते त्यांना सुचत नाही. केंद्र सरकारने मदतीचा वाटा उचलला नाही. महाराष्ट्राकडे दुजाभावाने केंद्र पाहते आहे, जनतेने आता याची खूणगाठ बांधली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: ED is working for BJP to unstable the MahaVikas Aghadi government said minister Jayant Patil.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x