मुंबई : तेलंगणात विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा टीआरच्या हाती सत्ता जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेलगू जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना स्पष्ट नाकारल्याचे चित्र समोर येऊ शकते. त्यामुळे दक्षिणेच्या राजकारणातील भाजपच्या प्रवेशाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
Times Now या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणातील अंदाजानुसार तेलंगणात पुन्हा एकदा TRS च्या चंद्रशेखर राव यांचीच सत्ता येईल. या सर्वेक्षानुसार केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला एकूण ६६ जागांवर विजय मिळेल. त्यामुळे ११९ संख्याबळ असलेल्या विधानसभेत ६६ जागांसह टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. तर भारतीय जनता पक्षाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेस आणि टीडीपी आघाडीला एकूण ३७ जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोल सर्व्हेत दाखवण्यात आला आहे.






























