11 January 2025 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

स्वबळाचं वचन मोडणारे उद्धव ठाकरे म्हणतात, 'आमच्या पाठीत वार स्वकीयांनीच केले'

Udhav Thackeray, Shivsena, BJP Alliance, Raj Thackeray, Narayan Rane, Marathi news channel, maharashtranama, digital news

मुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीनंतर टीका करणाऱ्यांवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांकडून हात वर करून स्वबळाचं वचन घेऊन देखील स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच ते पायदळी तुडवलं. त्यानंतर सामान्य मराठी माणसापासून ते विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. साडेचार वर्षानंतर अचानक भाजप आपल्याला पोषक भूमिका घेत असल्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना निवडणुकीला महिना शिल्लक असताना झाला.

दरम्यान आजच्या अग्रलेखात त्यांनी स्वतः मोडलेल्या वचनाकडे कानाडोळा करत, उलट त्यांची स्वार्थी भूमिकेवर टीका करणाऱ्या सामान्य माणसापासून ते विरोधकांपर्यंत सर्वांवरच त्यांनी उलटी टीका केली आहे. तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला या मथळ्याखाली अग्रलेख लिहण्यात आला असून यामध्ये युतीमागील राजकारण आणि पुन्हा युती करण्यामागील कारण सांगण्यात आले आहे. तर जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे, असा टोला लगावला आहे.

आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले . इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.

केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

परंतु, मागील काही दिवसांपासून शिवसेनेबद्दल अनेक नकारात्मक निवडणूकपूर्व सर्व्ह प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे वरवर दिसणारी देहबोली आतून भेदरल्यासारखी होती याचा प्रत्यय आज आला आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निवडणुकीआधी चालविचल झाल्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. कारण मागील २-३ वर्षांपासून उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल अशी घोषणा करत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा करताना शिवसैनिकांकडून जाहीरपणे हात वर करत वचन घेतलं होतं.

मात्र शिवसैनिकांकडून घेतलेल्या स्वबळाच्या जाहीर वाचनाला स्वतःच तीरांजली दिल्याने शिवसैनिक तोंडघशी पडले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून घेतलेल वचन स्वतःच पक्षाध्यक्षांनी मोडल्याने आता बोलणार तरी कोण अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x