13 January 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल
x

फरार आरोपींचे भाजपवर एकामागे एक आरोप, अर्थमंत्री अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय: ललित मोदी

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारतीय बँकांचे ९००० कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर पलायन केलेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. परंतु, त्यानंतर आता अजून एक भारताबाहेर पलायन केलेला आरोपी ललित मोदीने अर्थमंत्री अरुण जेटलींची तुलना सापाशी करत, त्यांना खोटं बोलण्याची सवय असल्याचा दावा करत विजय मल्ल्याची भेट झाल्याचं खरं असल्याचं म्हटलं आहे.

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्यावर आयपीएल लिलावात लाच घेण्याचा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. सन २०१० पासून ते भारतातून फरार झाले असून लंडन’मध्ये वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात. ललित मोदीने ट्विट करून म्हटलं आहे की, ‘तिथे असलेल्या लोकांना माहित आहे की, अरुण जेटलींनी विजय मल्ल्याची भेट घेतली होती. तरी ते वृत्त जेटली का फेटाळत आहेत? अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय आहे. तुम्ही एका सापाकडून (सर्पाचं चिन्ह) आणखी कोणती अपेक्षा ठेऊ शकता’? असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्या ट्विट मध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या या दोघांना टॅग करण्यात आलं आहे.

त्यामुळे घोटाळे करून फरार झालेले सर्व आरोपी एकामागोमाग भाजपचे बिंग फोडू लागल्याने एकूणच आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप तसेच मोदी सरकारच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x