29 April 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
x

स्वतः शरद पवार निरंजन डावखरेंविरोधात आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार स्वतः निरंजन डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निरंजन डावखरेंना धडा शिकवायचाच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.

आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे ठरविल्याने राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीने निरंजन डावखरेंविरोधात एनसीपीचे ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना मैदानात उतरविले आहे.

स्वतः शरद पवार यांनी त्यासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी बुधवारी पक्षाची बैठक आयोजित केली आहे. पवार त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सहित राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या