23 February 2025 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO: कमलेश राय कोणत्या पक्षात? म्हणाले उद्धवजींना घेऊन या, अंधेरी पूर्वेतील काँग्रेस निवडणुकीसाठी सक्षम आहे

मुंबई : मरोळ अंधेरी पूर्व काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश राय यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी सुषमा राय या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यामुळे काँग्रेस नगरसेविकेच्या निधी आणि प्रयत्नातून मरोळ भवन ते सागबाग रोडचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, या भूमिपूजनाच्या कामाचे श्रेया लाटण्याचा शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी आणि आमदारांनी केविलवाणा प्रयत्न केला खरा, परंतु विद्यमान काँग्रेसच्या नगरसेविका असलेल्या सुषमा राय यांचे पती आणि माजी नगरसेवक कमलेश राय यांनी भाषणादरम्यान अंधेरी पूर्वेतील काँग्रेस किती सक्षम आहे याची जाणीव थेट उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करून देण्याचं भाष्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे उपस्थित शिवसेनेचे आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिक पदाधिकारी सुद्धा तोंडघशी पडले आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार रमेश लटके आणि माजी नगरसेवक प्रमोद सावंत उपस्थित होते.

संजय निरुपम समर्थक समजले जाणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश राय सध्या संजय निरुपम याच्यासोबत राजकीय मतभेद झाल्याचे वृत्त पुढे आले होते. दरम्यान, शिवसेना प्रवेशापूर्वी ‘मी केवळ अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे, असा बहाणा करत अंधेरी पूर्वेला उत्तर-भारतीय महासंमेलन आयोजित करण्याची योजना आखत होते. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. परंतु ते वृत्त प्रसार माध्यमांमध्ये पसरताच ते कार्यक्रम बासनात गुंडाळण्यात आला होता.

वास्तविक त्यांच्या शिवसेना प्रवेशाची दुसरी बाजू ही जी प्रसार माध्यमांच्या हाती लागली आहे आणि ती म्हणजे माजी नगरसेवक कमलेश राय यांचे अंधेरी पूर्व मरोळ येथे एक अनधिकृत ‘लॉजिंग बोर्डिंग’ बांधकाम होते. त्यावर काही दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई करत हातोडा फिरवला होता. तसेच असं अनधिकृत बांधकाम असल्यास निवडणूक लढविणे सुद्धा भविष्यात कठीण होऊ शकते याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्यास अभय मिळण्याची शक्यता असल्याने राम मंदिरांच्या निर्माणासाठी समर्थन, असा गाजावाजा करत शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी कमलेश राय यांनी सुरु केली आहे. त्यांच्यासोबत घनश्याम दुबे हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते.

अंधेरी पूर्वेकडून भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक रमेश लटके यांना तगडं आवाहन देणार आहेत. त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल सुद्धा याच मतदारसंघात भाजपच्या नगरसेविका आहेत. दरम्यान, २०१४ मध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल हे शिवसेनेत असल्याने शिवसेनेचे आमदार रमेश लटके हे विजयी झाले होते आणि त्याला मुख्य कारण होतं ते सध्या भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल यांचं कार्यकर्त्यांचं जाळं आणि संपर्क. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या मुरजी पटेल यांना पोषक असून त्यांचा या मतदारसंघात तगडा संपर्क आणि कार्यकर्त्यांचं जाळं आहे. त्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके विकासकामांची बोंब करत आहेत, पण कमलेश राय यांच्यासारखे शिवसैनिक भाषणात पक्षालाच तोंडघशी पाडत आहेत, असे म्हणावे लागेल.

काय म्हणाले कमलेश राय भाषणात काँग्रेसबद्दल आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x