18 April 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत: निलेश राणे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होत. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरा विषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोचरा प्रश्न केला आहे. राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला आणि अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे की,’बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत?’.

स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भावनिक मुद्दा त्यावेळी शिवसेनेने उचलून धरला होता. परंतु सत्तेत येऊन इतकी वर्ष स्वर्गीय. बाळासाहेबांच्या त्या स्मारकाची साधी वीट सुद्धा रचली न गेल्याने निलेश राणें’ना आयतीच संधी मिळाली असून त्यांनी अचूक वेळ साधत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करणारा प्रश्न उपस्थित केला आहे.

नेमकं काय आहे माजी खासदार निलेश राणे यांचं ते ट्विट;

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या