5 November 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

गोव्यात सत्ता टिकवणे हेच फडणवीसांसमोर आव्हान | भाजपच्या आमदारांच्या घरी स्नेहभोजनाचे कार्यक्रम

Goa BJP

पणजी, २२ सप्टेंबर | महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची गोवा राज्याच्या निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर फडणवीस सोमवारी गोव्यात दाखल होऊन त्यांनी दिवसभरात राज्यातील मंत्री, नेते व विविध पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या, दरम्यान सोमवारच्या विविध चर्चात फडणवीसांना राज्यातील अनेक नेते नाराज असल्याचे दिसून आले. तर काही नेते त्यांच्यासमोरच टोकाची भूमिका घेऊन हातघाईस आल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेची मोट बांधण्यासाठी आधी भाजपातल्या नाराज आमदारांना एकत्र आणण्यासाठी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.

गोव्यात सत्ता टिकवणे हेच फडणवीसांसमोर आव्हान, भाजपच्या आमदारांच्या घरी स्नेहभोजनाचे कार्यक्रम – Goa BJP election incharge Devendra Fadnavis holds meetings with BJP unhappy MLAs :

सत्ता टिकविण्याचे आव्हान:
आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत यांच्या बरोबरीने काम करून भाजपचे सर्वाधिकमहाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची गोवा राज्याच्या निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर फडणवीस सोमवारी गोव्यात दाखल होऊन त्यांनी दिवसभरात राज्यातील मंत्री, नेते व विविध पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या, दरम्यान सोमवारच्या विविध चर्चात फडणवीसांना राज्यातील अनेक नेते नाराज असल्याचे दिसून आले. तर काही नेते त्यांच्यासमोरच टोकाची भूमिका घेऊन हातघाईस आल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेची मोट बांधण्यासाठी आधी भाजपातल्या नाराज आमदारांना एकत्र आणण्यासाठी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. आमदार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने निवडणूक प्रभारी या नात्याने फडणवीस यांच्यावर सोपविली आहे. २०१७ साली नितीन गडकरी यांनी संकटमोचक होऊन घटक पक्षांची मोट बांधून मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी गडकरी यांनी मोलाची भूमिका निभावून ऐनवेळी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असतानाही महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांना एकत्र आणून राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आणले होते. मात्र २०१९ नंतर घटक पक्षाना बाजूला करून काँग्रेस आणि मगोचे आमदार फोडून त्यांना भाजपात प्रवेश देऊन भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले होते. मात्र याच आमदाराच्या व जुन्या नेत्यांच्या अंतर्गत वादाला छमविण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे.

लोबो विरुद्ध म्हाव्हीन वाद:
कॅलनगुटचे आमदार आणि विद्यमान मंत्री मागच्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यातील डिजिटल मीटर वरून त्यांनी वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांना टार्गेट केले होते. त्यामुळे लोबो विरुद्ध म्हाव्हीन असा वाद उफाळून आला होता. तसेच लोबो याना आपल्या पत्नीलाही शिवोली मतदारसंघातून निवडणुकीत उतरवायचे आहे, त्यामुळे त्यांनी मागच्या काही दिवसांपासून या मतदारसंघात आपला हस्तक्षेपही वाढविला होता. त्यामुळे याची तक्रार येथील आमदार दयानंद मांद्रेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे लोबो यांची फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली.

बाबू कवलेकर विरुद्ध मुख्यमंत्री:
काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवलेकर यांना आपल्या पत्नीला सांगे मतदारसंघातून निवडणुकीत उतरवायचे आहे, मात्र त्याला मुख्यमंत्रांचा विरोध आहे, त्यामुळे नाराज असणाऱ्या कवलेकरांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस यांनी त्यांच्या घरीच जाणे पसंद केले, आणि सोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रमही केला.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात बरेच मतभेद:
कोविड काळात आरोग्य यंत्रणेवरून उदभवलेल्या वादावरून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात बरेच मतभेद निर्माण झाले होते. त्यातच राणे वयक्तिक रित्या दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेत, त्यामुळे सावंत राणे वाद निर्माण झाला होता, मात्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री विश्वजीत राणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व सोबत स्नेहभोजन ही केले.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक राज्याच्या राजकारणात येण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद ही जाऊ शकते अशी मध्यंतरी चर्चा ही सुरू झाली होती. मात्र नाईकांना दिल्लीतच ठेवून राज्य प्रमोद सावंतांकडे देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. त्यातच नाईक यांना आपला मुलगा सिद्धेश याला कुंभारजुवेतुन निवडणुकीत उतरवायचे आहे, मात्र त्याला येथील आमदार पांडुरंग मंडकयकर यांचा विरोध आहे, याच गोष्टींमुळे श्रीपाद नाईक नाराज होते, मात्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली.

काँग्रेस नेत्यांनाही गोंजारलं:
फडणवीसांनी भविष्यातील अंदाज घेऊन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, त्यामुळेच पिता पुत्रांना एकत्र आणण्याचा कयास फडणवीस यांचाही असेल. दरम्यान फडणवीस यांच्या राणे भेटीने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. कॉंग्रेसवासी असणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी २०१७ साली असाच धक्का देऊन भाजपात प्रवेश केला होता, व पुढे ते पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Goa BJP election incharge Devendra Fadnavis holds meetings with BJP unhappy MLAs.

हॅशटॅग्स

#Goa(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x