26 April 2025 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी दिल्लीला रवाना, मुख्यमंत्रीपद सोडणार?

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती कारणास्तव सध्या गोव्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. पर्रीकर ६ सप्टेंबरला अमेरिकेतून उपचार घेऊन परतले. मागील ७ महिन्यांपासून आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बुधवारीच त्यांना पणजीतील रुग्णालयात प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळीच ते एम्समध्ये उपचार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत. तर पुढील उपचारासाठी ते अमेरिकेला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. उपचारासाठी पर्रीकर आतापर्यंत ३ वेळा अमेरिकेत जाऊन आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे पर्रीकर यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतंय.

त्यामुळे लवकरच भाजपची उच्चस्तरीय टीम गोव्याला जाऊन आमदारांचे मत जाणून घेणार आहे आणि त्यानंतरच मनोहर पर्रीकर यांचा उत्तराधिकारी घोषित केला जाईल असं म्हटलं जात आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या