21 November 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NCRB रिपोर्ट | महिला अत्याचारात भाजपशासित राज्य देशात टॉप 3 मध्ये | तर राज्यपालांचे ठाकरे सरकारला विशेष अधिवेशनसाठी पत्र

Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई, २१ सप्टेंबर | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे. इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेची दखल घेणं, त्यात अधिवेशन बोलावण्याच्या सूचना करणं हे म्हणजे राज्याच्या सक्रीय राजकारणात वाढत्या हस्तक्षेपाचं द्योतक आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. (Governor Bhagat Singh Koshyaris letter to CM Uddhav Thackeray)

NCRB Report,  महिला अत्याचारात भाजपशासित राज्य टॉप देशात 3 मध्ये, तर राज्यपालांचे ठाकरे सरकारला विशेष अधिवेशनसाठी पत्र – Governor Bhagat Singh Koshyaris letter to CM Uddhav Thackeray to call special assembly session over law and order in State :

राज्यपालांनी ठाकरे सरकारला विशेष अधिवेशनसाठी खरमरीत पत्र लिहिलं असलं तरी केंद्र सरकारच्या डेटाप्रमाणे म्हणजे NCRB रिपोर्टप्रमाणे महिला अत्याचारात २ भाजपशासित राज्य देशात टॉप थ्री मध्ये असल्याने भाजप याविषयात राज्यपालांमार्फत राजकारण करत असल्याचा आरोप होऊ शकतो.

महिलावंरील बलात्काराच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोमधून (एनसीआरबी) समोर आली आहे. 2020 मध्ये रोज सरासरी 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहे. या वर्षात 28,046 बलात्काराच्या घटना घडल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीमधून समोर आले आहे.

गतवर्षी महिलांविरोधातील अन्यायाचे एकूण 3,71,503 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2019 मध्ये महिलांशी संबंधित 4,05,326 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2018 मध्ये महिलांशी संबंधित 3,78,236 गुन्हे नोंदविण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.

कोरोना महामारीतही बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त:
2020 मध्ये कोरोना महामारी आणि देशात टाळेबंदी सुरू होती. या काळात महिलांवरी 28,046 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. यामधील 25,498 हे पीडित हे प्रौढ तर 2,655 पीडित हे 18 वर्षांहून कमी होते. भारतीय दंडविधान कायदा कलम 376 नुसार बलात्काराच्या प्रकरणाची गुन्हा म्हणून नोंद होते. 2019 मध्ये 376 कलमानुसार 32,033 तर 2018 मध्ये 33,356 तर 2017 मध्ये 32,559 बलात्कार प्रकरणांची पोलिसांत नोंद झाली आहे.

महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये ही राज्ये आहेत आघाडीवर:
2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे 5310 बलात्काराची प्रकरणे एकट्या राजस्थानमध्ये घडली आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 2,769, मध्यप्रदेशमध्ये 2,339, महाराष्ट्रात 2061 तर आसाममध्ये 1,657 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. तर दिल्लीमध्ये 997 बलात्काराची प्रकरणे घडली आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Governor Bhagat Singh Koshyaris letter to CM Uddhav Thackeray to call special assembly session over law and order in State.

हॅशटॅग्स

#BhagatSinghKoshayari(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x