15 January 2025 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

गुजरात विधानसभा २०१७ भाजप पुन्हा सत्तेत, परंतु काँग्रेसची हि कडवी झुंज.

गुजरात : आजच पार पडलेल्या गुजरात विधानसभा २०१७ च्या मतमोजणीत सिध्द झालं की गुज़रात मध्ये भाजपचं पुन्हां सरकार स्थापन करणार. मतमोजणी आणि वारंवार बदलत जाणारे आकडे पाहता सुरवातीचे काही तास काँग्रेसच सरकार स्थापन करते कि काय अशी वातावरण निर्मिती झाली असताना शेवटच्या क्षणी भाजपने मुसंडी घेत काही जागांच्या फरकाने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु प्रचारादरम्यान राहुल गांधींनी घेतलेली आघाडी पाहता काँग्रेसने ही कडवी झुंज दिली त्याची हि भरपूर चर्च्या चालू झाली आहे.

सुरवाती पासूनच मोदींना त्यांच्याच होमग्राउंड वर जेरीस आणण्याची राहुल गांधींची रणनीती मोदी आणि अमित शहांची चांगलीच दमछाक करून गेली यात काहीच वाद नाही. गुजराती जनतेचा रोष पाहता शेवटी मोदींनी संपूर्ण निवडणूक भावनिक मुद्यांवर केंद्रीत केली आणि विकासाचा मुद्दा प्रचारादरम्यान अगदी दिसेनासाच झाला. शहरी भागात भाजप ला उत्तम यश मिळालं तर काँग्रेस ने ग्रामीण गुजरात मध्ये चांगली आघाडी घेतल्याचे दिसले.

संपूर्ण पणे विविध जातीय राजकारणावर आधारलेली गुजरात विधानसभा २०१७ हि अखेरच्या क्षणी का होईना भाजप ला आणि मोदींना दिलासा आणि आत्मविश्वास द्विगुणीत करणारी ठरली.

काँग्रेस मुक्त भारत करताना मोदींच्या गुजरात मध्ये काँग्रेस च्या पूर्वी पेक्षा अधिक जागा निवडून आल्या असून, ते भाजप साठी २०१९ मध्ये सूचक इशारा देणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी ज्या वडनगर मतदार संघातून निवडणूक लढवतात तिथे भाजपचा पराभव झाला असून तिथे काँग्रेस चा उमेदवार विजयी झाला आहे ही सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे आणि तो मोदींन साठी त्यांच्याच मतदारसंघातील जनतेने दिलेला सूचक इशारा मानला जात आहे. गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे.

हाती आलेली एकूण जागांची आकडेवारी खालील प्रमाणे;

भाजप एकूण जागा – ९९

काँगेस एकूण जागा – ८०

इतर – ३

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x