15 January 2025 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

संतापजनक! शहीद जवानांमुळे देशात राष्ट्रभक्तीची लाट, मतांमध्ये रूपांतरित करा: गुजरात भाजप नेते

Narendra Modi, Guajarat, Pulawama Attack, Bharat Pandya

वडोदरा : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आलेली आहे. प्रत्येक भारतीय देशभक्तीने पेटून उठलेला असताना, एक संतापजनक आणि रक्त खवळून सोडणारी घटना घडली आहे. गुजरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंड्या यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

सोमवारी वडोदरा येथे भाजप कार्यकर्त्यांचा बूथ निहाय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना भरत पंड्या म्हणाले की, “जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल, त्यानंतर लोकांमधील राष्ट्रवादाची भावना निर्माण झाल्याचे सुद्धा आपण पाहिले आणि सर्वजण एकत्र आले आहेत, सामान्य भारतीय रस्त्यावर उतरून देशभावना व्यक्त करत आहेत, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला असता कसा माहोल होता? संसदेत कोणत्या प्रकारचे मुद्दे उचलले गेले होते? त्यावेळी अशी चर्चा होती की त्या दहशदवादी हल्ल्यात मदत करणाऱ्या स्थानिक लोकांची चौकशी केली जात होती आणि त्यांना सुरक्षा यंत्रणा अटक करत होत्या, परंतु परिस्थिती खूप वेगळी आहे, आज देशवासी रात्रभर जागून पाकिस्तनावर काय कारवाई झाली ते पाहण्यास आतुर झाले आहेत, देशवासी आज राष्ट्रवादाच्या भावनेने एकत्र आले आहेत, आता भाजप कार्यकर्ते म्हणून ही आपली जवाबदारी की लोकांच्या या राष्ट्रप्रेमाला मतांमध्ये कस परिवर्तित करता येईल,” असं सांगत भरत पंड्या यांनी कार्यकर्त्याना चेतावण्याचा प्रयत्न केला.

मात्र यातून एकच संतापाची लाट पसरली आहे. देशवासीयांची राष्ट्रापतीची भावना आणि शहीद जवान म्हणजे मतपेटी वाढवण्याचं साधन मानलं जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचं किळसवाणं राजकारण समोर आलं आहे. शहीद जवानांच्या नावाने उद्या भाजपने मतं मागितल्यास नवल वाटणार नाही. परंतु भारतीय म्हणून सामान्य लोकं हे किती सहन करणार हा देखील प्रश्न येतोच.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x