15 January 2025 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

नाहीतर अपक्ष लढवून एकाएकाची पुंगी वाजवेन, एनसीपीला इशारा ?

कराड : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजें भोसले यांनी एनसीपीला अप्रत्यक्ष इशारा दिला असून, जर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून एकाएकाची पुंगीच वाजवेन असा दम उदयनराजें भोसले यांनी दिला आहे.

जर राजेशाही असती तर एका-एका आमदाराला धडा शिकवला असता. तुमच्यात हिम्मत असेल तर थेट मैदानात या मग बघा कशी एकाएकाची पुंगीच वाजवतो असा इशारा उदयनराजें भोसले यांनी त्यांच्या विरोधकांना दिला आहे. खासदार उदयनराजें भोसले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेचा विषय असतात.

काही दिवसांपुरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची नक्कल करून दाखवली होती. परंतु त्यावर उदयनराजे भोसलेंना विचारले असता ते म्हणाले की,’शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून त्यांनी माझी कॉलरची केलेली स्टाईल आवडली. कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले’.

काही असले तरी राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल आणि जर नाही मिळाली तर तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून एकाएकाची पुंगीच वाजवेन असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याचे बोलले जात आहे. कराड येथे आयोजित लोककला संमेलनाच्या समारोपासाठी खासदार उदयनराजे भोसले येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे ते पत्रकारांना म्हणाले की, येत्या लोकसभेची तयारी काय करायची ? मी काम करत राहायचे हे ठरवले आहे. त्यामुळे ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी खुशाल भरावा कारण लोकशाही आहे. पण येथील लोकांचा आग्रह हा मी अर्ज भरावा म्हणून आहे. मग मी कसा थांबेन? राष्ट्रवादी कॉग्रेस खासदारकीची उमेदवारी मलाच देणार. त्यामुळे कोणी यायचे त्यांनी मैदानात यावे, मग बघू, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x