27 April 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

सकाळी घरचांशी झालेला फोनकॉल शेवटचा संवाद ठरला, संध्याकाळी देशासाठी वीर मरण

पुणे : सकाळीच घरातील कुटुंबियांसोबत झालेला संपर्क हा नियतीने शेवटचा संवाद ठरवला असावा असं काहीस घडलं आहे. कारण पुण्यातील नायर कुटुंबाला सुद्धा १२ दिवसांपूर्वी कुटुंबासोबत नववर्षाचे आगमन साजरा करणारा आणि लष्कराच्या सेवेत असलेला आपला मुलगा, आज या जगात नसेल याची स्वप्नात सुद्धा कल्पना आली नसावी.

कारण, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात आतंवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन विजय नायर यांना वीर मरण आले आहे. त्यांचे कुटुंब पुण्याच्या खडकवासला येथे वास्तव्यास आहे. नौशेरा सेक्टरमध्ये गस्तीवर असताना जवानांना लक्ष्य करण्यासाठी आतंकवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसच्या मदतीनं प्रचंड मोठा स्फोट घडवून आणला. त्यात नायर देशासाठी शहीद झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण पुण्यात शोककळा पसरली आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही अनमोल क्षण घालविले होते, जे शेवटचे क्षण ठरले असं काहीसं नियतीने घडविले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony