17 November 2024 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

राहुल गांधींना काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष बनविण्याच्या हालचाली | युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव मंजूर

Rahul Gandhi

नवी दिल्ली, ०६ सप्टेंबर | काँग्रेसचे वायनाडचे खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. युवक काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गेली सव्वा दोन वर्षे सोनिया गांधी याच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर आहेत.

राहुल गांधींना काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष बनविण्याच्या हालचाली, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव मंजूर – its national executive meeting Indian Youth Congress passes a resolution for Congress party leader Rahul Gandhi :

राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपदी यावे यासाठी काँग्रेसचे अनेक निष्ठावंत नेते प्रयत्न करीत आहेत. पण कपिल सिब्बल, आनंद शर्मा यांच्या सारखे जी – २३ गटाचे नेते गांधी परिवारा व्यतिरिक्त काँग्रेस नेत्याने अध्यक्षपद संभाळावे या मताचे आहेत. त्यांनी सोनिया गांधींना तसे पत्र लिहून आता वर्ष होत आले आहे. या पैकी अनेक नेते अनेकदा तशी जाहीरपणे इच्छा देखील व्यक्त करताना दिसतात.

या राजकीय पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीचा अनुकूल ठराव करून घेऊन पक्षातल्या जुन्या जी – २३ नेत्यांच्या गटालाच एक प्रकारे आव्हान देण्यात आल्याचे मानण्यात येत आहे.

अर्थात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावर अद्याप कोणते भाष्य केलेले समोर आलेले नाही. पण पक्षातले तरूण नेते राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र या निमित्ताने काँग्रेसमधल्या गांधीनिष्ठ नेत्यांनी करायला सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: At its national executive meeting Indian Youth Congress passes a resolution for Congress party leader Rahul Gandhi.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x