संधी द्या, स्वच्छ आणि सुरक्षित औरंगाबाद शहर देतो : राज ठाकरे
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता औरंगाबादमधील भेटीदरम्यान त्यांनी औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला. दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विकासासोबत औरंगाबाद शहर आणि राजकारणातील वास्तव सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला.
उपस्थित संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता. एकदा डोळे उघडून नीट बघा, कानावरचे हात बाजूला काढा. आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल . मनसेला संधी द्या, मी स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो.” असं आवाहन राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिल.
औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणातील एक खंत व्यक्त केली की, ‘विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. केवळ अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असं सांगताना नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकतात ,”असा विश्वास त्यांनी औरंगाबादवासीयांना दिला.
औरंगाबाद शहरातील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, औरंगाबाद शहरात राजकारणी तुम्हाला भीती दाखवतात, निवडणुकीच्या वेळी दंगली घडवल्या की तुम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करता, मग कशाला हवा तुम्हाला विकास असा घणाघात राज ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर केला.
दरम्यान त्यांनी नुकताच औरंगाबाद शहरातील गाजलेला कचरा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. गेल्या २५ वर्षात तुमचे शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही आणि त्यामुळे नागरिक म्हणून त्यांना तुमची भीतीच उरलेली नाही. हेच कारण आहे की,’कचरा प्रश्न तसाच रेंगाळत पडला आहे’. नाशिक शहरात मनसेने काही नसतांना खूप चांगल्या गोष्टी केल्या. औरंगाबादकडे तर जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्या आहेत.याचा अर्थ जगभरातील विमानं तुमच्या शहरात उतरायला हवीत. या लेण्यांची योग्य काळजी आणि मार्केटिंग केले तर महाराष्ट्राला हजारो कोटीच उत्पन्न मिळेल असं राज ठाकरे म्हणाले.
‘राजकारण आणि मतदान हसण्यावारी घेऊ नका असे आवाहन मनसे अध्यक्षांनी उपस्थितांना केले. छोट्या मोठ्या घटनांना घाबरू नका, एकदा मला संधी द्या, मग बघतो तुम्हाला कोण हात लावतो ते’, असा विश्वास व्यक्त करतानाच पुढच्या वेळी मी येईन तेव्हा औरंगाबाद शहराच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर ठेवीन असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला. पुढे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते ‘ते’ हैद्राबाद वरुन येतात, भीतीदायक वातावरण करतात, दोघांचाही लाभ करुन पाच वर्षासाठी निघून जातात.
Web Title: I will provide clean and safe city says Raj Thackeray to Aurangabad citizens.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल