15 January 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Jasmeen Wankhede | वानखेडेंची बहीण मनसे पदाधिकारी | तर समीर वानखेडेंच्या खबरी विरोधात ओशिवऱ्यात खंडणीची तक्रार

Jasmeen Wankhede

मुंबई, 16 ऑक्टोबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी (Jasmeen Wankhede) केले आहेत. मलिकांच्या या प्रश्नांना आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलंय.

Jasmeen Wankhede. NCP spokesperson Nawab Malik has raised a barrage of questions against NCB official Sameer Wankhede in the Mumbai drugs case. Who is Lady Dawn in the photo with Fletcher Patel? What has this Lady Dawn got to do with you? What is her connection with Bollywood? Such questions have been asked by Nawab Malik :

कॅबिनेत मंत्री असं अनव्हेरिफाईट स्टेटमेंट देत आहेत. काही स्टेटमेंट देण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपटच सेनेत उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय स्टेटसचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला, असं आव्हान यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांना दिलंय.

समीर वानखेडेंच्या खबरी विरोधात धमकी आणि पैशांची मागणी वरून तक्रार दाखल:
दुसरीकडे, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव वापरून धमकी दिल्याबद्दल आणि पैशांची मागणी केल्याबद्दल वानखेडेंच्या खबरी विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराने ही तक्रार एफआयआरमध्ये बदलण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या भोवती आणि NCB’च्या कारवाईत (पंच आणि साक्षीदार) अनेक वाईट प्रवृत्तीचे लोक जोडले गेल्याचे अनेक पुरावे याआधी समोर आले आहेत. त्यानंतरही अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Jasmeen Wankhede a sister of Sameer Wankhede came into picture after serious allegations.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x