24 November 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | कन्हैया कुमार आणि आ. जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kanhaiya Kumar & Jignesh Mevani

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर | सीपीआयचे नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश (Kanhaiya Kumar & Jignesh Mevani joins congress) केला आहे. नुकतेच कन्हैय्या कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आमदार जिग्नेश मेवानी यांच्यामुळे गुजरातच्या राजकारणाची तर कन्हैया यांच्या बिहारच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

CPI leader Kanhaiya Kumar and independent Gujarat MLA Jignesh Mewani have joined the Congress. Recently, Kanhaiya Kumar had met Rahul Gandhi :

कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल:
या प्रवेशाबाबत अनेक काँग्रेस नेत्यांना विश्वास वाटतोय, की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळेल. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास काम करू शकली नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआयच्या (एमएल) तुलनेत काँग्रेसच्या जागा फारच कमी आल्या. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागा जिंकल्या. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआयने (एमएल) १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते.

कन्हैया कुमार पक्षावर कमालीचे नाराज असल्याचे समोर आले:
काही दिवसांपुर्वी हैदराबाद येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत कन्हैया कुमार यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानेच (सीपीआय) निषेध केला होता. त्यानंतर कन्हैया कुमार पक्षावर कमालीचे नाराज असल्याचे समोर आले आहे. तसेच, आपल्याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमुळे जी पाहीजे ती जागा मिळत नाही. किंबहून आपली घुसमट होत आहे अशी भावना कन्हैया यांची असल्यामुळे ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते.

अशी आहे गुजरातमधील राजकीय स्थिती:
भुपेंद्र पटेल यांच्यासाठी पुढील 14 महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त 14 महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, 2022 मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kanhaiya Kumar and Jignesh Mevani joins congress party.

हॅशटॅग्स

#KanhaiyaKumar(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x