16 April 2025 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | राहुल गांधी प्रचार यंत्रणेसाठी प्रस्थापितांना बगल देत तरुण नेत्यांना पुढे आणणार?

Kanhaiya Kumar Jignesh Mevani

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर | गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैय्या कुमार आणि आरडीएमचे आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये 28 सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.गुजरातच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नुकतेच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली आहे.

राहुल गांधी धाडसी निर्णय घेणार?, प्रचारासाठी प्रस्थापितांना बगल देत तरुण नेत्यांना पुढे आणणार? – Kanhaiya Kumar, Gujarat MLA Jignesh Mevani Set To Join Congress Next Week :

अशी आहे गुजरातमधील राजकीय स्थिती?
भुपेंद्र पटेल यांच्यासाठी पुढील 14 महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त 14 महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, 2022 मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष मजूबत करण्याकडे लक्ष दिले आहे. कन्हैया कुमार तरुण आणि तडफदार आहेत. तसेच तरुण, विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणं, मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असा अदांज काँग्रेसमधील नेते बांधत आहेत.

दुसरकडे, गुजरातमध्येही काँग्रेसची फारशी चांगली स्थिती नाही. गांधी घराण्याशी जवळचा संबंध असणारे अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे गुजरातचे राजकारण आणि केंद्रीय नेते यांच्यातील संपर्कदुवा कोण होणार याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. तर दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणूक लढवून आमदार होण्याची किमया जिग्नेश मेवाणी यांनी साधलेली आहे. दलित तसेच दुबळ्यांचे प्रश्न मांडणारा तरुण नेता म्हणून जिग्नेश यांची ओळख आहे. गुजरातमध्ये जिग्नेश चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kanhaiya Kumar and MLA Jignesh Mevani likely to join congress on Bhagat Singh birth anniversary.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#KanhaiyaKumar(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या