15 January 2025 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

चौकीदार केवळ चोरच नाही तर चंपक देखील आहे : कन्हैया कुमार

नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतर अनेकांवर २०१६ मधील प्रकरणात देशद्रोहाचे आरोपपत्र तब्बल तीन वर्षांनंतर दाखल करताना याचिका कर्त्यांकडून दिल्ली राज्य सरकारची कोणतीही अधिकृत परवानगीच घेतली नसल्याचा मुद्दा पुढे करून, सुप्रीम कोर्टाने सर्वांवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलली असून पोलिसांच्या कृत्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत एकूण याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यामुळे कन्हैया कुमारला सुद्धा मोठी संधी मिळाली असून त्याने मोदी तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खासगी वृत्तवाहिनीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमाचा दाखला देत त्याने देशाचं न्यायालय म्हणजे ‘आप की अदालत’ समजू नका असा अप्रत्यक्ष आणि जोरदार टोला मोदींना लगावला आहे.

त्याने ट्विट करून म्हटले आहे की, “सर्वप्रथम आरोपपत्रात खोटी माहिती लिहिण्यासाठी तब्बल ३ वर्ष लावली, नंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताही थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले. देशाच्या न्यायालयाला आणि टीव्हीवरच्या आप की अदालतला तुम्ही एकच समजलात वाटतं, चौकीदार केवळ चोरच नाही तर चंपक देखील आहे’ असा खरमरीत टोमणा त्याने ट्विटरद्वारे भारतीय जनता पक्षाला आणि मोदी सरकारला मारला आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x