21 November 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA
x

Kapil Sibal Vs Modi Shah | गुजरात मधून दिल्लीत आलेल्या नेत्यांना गांधीजींविषयी फारशी माहिती नाही - कपिल सिब्बल

Kapil Sibal Vs Modi Shah

नवी दिल्ली , ०२ ऑक्टोबर | गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही, अशा शब्दात काँग्रेसचे जी 23 चे बंडखोर नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर (Kapil Sibal Vs Modi Shah) टीकास्त्र सोडले आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलजीवन मिशन 2 ची सुरुवात केली आहे. त्याच वेळी महात्मा गांधींना स्वच्छता मिशनची जोडले आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी त्यांच्यावर असत्यतेचा आरोप केला आहे.

Kapil Sibal Vs Modi Shah. Leaders from Gujarat who’ve reached Delhi, maybe they know little about Gandhi ji. He has always said there is only god and the god is the truth said Congress leader Kapil Sibal in Ahmedabad :

कपिल सिब्बल म्हणाले, की गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही. गांधीजी म्हणायचे परमेश्वर एकच आहे. सत्य म्हणजेच परमेश्वर. पण मी मोदीजींना विचारू इच्छितो, त्यांच्याकडे सत्य कुठे आहे? त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत फक्त खोटेपणाचा आढळतो, असे टीकास्त्र कपिल सिब्बल यांनी सोडले आहे.

कपिल सिब्बल यांनी आत्तापर्यंत काँग्रेस नेत्यांना विशेषत: काँग्रेस हायकमांडला घेरले असल्याने ते सतत चर्चेत आहेत. पण आता त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीकास्त्र सोडून आपला निशाणा काँग्रेस नेत्यांपासून भाजप नेत्यांकडे वळवण्याचे स्पष्ट होत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kapil Sibal Vs Modi Shah on day of Gandhi Jayanti.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x