1 January 2025 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

कारण पक्षांतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप? | पण वय, आरोग्याचं कारण देत येडियुरप्पा राजीनाम्याच्या तयारीत

BS Yediyurappa

बंगळुरू, १७ जुलै | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे. यासाठी त्यांनी वय आणि आरोग्याच्या तक्रारी पुढे करत दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सध्या तरी येडियुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.

विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. वाढते वय आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या यामुळे येडियुरप्पा अधिककाळ मुख्यमंत्रीपदी राहणं शक्य नाही. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरोग्याचं कारण पुढं करत राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती.

त्यानंतर आज त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याकडेही येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. त्यासाठीच ते दोन दिवस दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत. भाजपमधील आमदारांनी देखील त्यांना हटवण्याची मागणी केली होती तसेच त्यांच्यावर पक्षांतर्गत आणि विरोधकांकडून भष्टाचाराचे अनेक आरोप देखील करण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाची प्रतिमा देखील मलीन होतं असल्याने वरिष्ठांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं. त्यामुळे लवकरच कर्नाटकाच्या पुढच्या मुख्यमंत्र्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन नड्डा यांनी येडियुरप्पा यांना दिलं आहे. लवकरच कर्नाटकातील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली जाईल. तोपर्यंत येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Karnataka CM BS Yediyurappa may resign soon reached to meet JP Nadda news updates.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x