14 January 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

...तर १०० पटीने श्रीमंत व्हाल आणि मंत्रिपद सुद्धा मिळेल - ऑडिओ क्लिप

बंगलोर: सध्या कर्नाटकात चाल्लेला सत्तेचा घोडेबाजार काही थांबता थांबत नाही आहे. कर्नाटकात नेमकी कुणाची सत्ता येणार हे आज दुपारी ४ वाजता आपल्याला कळेलच पण सद्य परिस्थिती पाहत हे भाजपसाठी तितके सोपेहि नाही. भाजपकडे १०४ आमदारांचं संख्याबळ असताना आणि पुर्नबहुमतासाठी लागणारी ११२ ची मॅजिक फिगर नसताना देखील त्यांनी कशाच्या जोरावर सत्तास्थापनेचा दावा केला हे सर्वश्रुत आहेच.

उरलेल्या ८ आमदारांच्या समर्थनासाठी त्यांनी अक्षरशः रान उठवल्याच समजते आहे. यातच काँग्रेसने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप कोट्यवधी रुपये आणि मंत्रिपदाची आमिष दाखवून आमच्या आमदारांना पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते जनार्दन रेड्डी यांनी आमच्या आमदारांना फोन करून कोट्यवधी रुपयांची लाच देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. या संदर्भातील एका ऑडिओ क्लिप काँग्रेसने पत्रकार परिषदेत जारी केली.

हि ऑडिओ क्लिप कन्नड भाषेत असून समोरील व्यक्ती कन्नड भाषेत बोलत लाच देण्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काय आहे संभाषणात?
आम्हाला सांगा तुम्हाला कुठला पद हवं आहे? आपण समोर-समोर बसून बोलू आणि ठरवू. जर तुम्ही ऑफर स्वीकारली तर तुम्ही मंत्री बानू शकता आणि मोठ्या लोकांबरोबर तुमची उठबस होऊ शकते. तसहि संपूर्ण देशावर ते राज्य करत आहेत. आणि आता तुमची जेवढी संपत्ती आहे त्याच्या १०० ती वाढवण्याची तुम्हाला संधी आहे.

हे संभाषण नेमकं कुणाचा आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. याउलट भाजपने काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x