18 October 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

शबरीमला मंदिरात दोन महिलांनी घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन

केरळ : केरळमधील २ महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयानंतरही कालपर्यंत एकासुद्धा महिलेला अयप्पांचे दर्शन घेने शक्य झाले नव्हते.

त्यानंतर अनेक महिला कार्यकर्त्यांनी आणि महिला सामाजिक संघटनांनी सुद्धा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तीव्र विरोधामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी ज्या महिलांना दर्शन घ्यायचे आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवण्याचा आदेश जारी केला होता. दरम्यान, आज २ धाडसी महिलांनी पोलीस संरक्षणात मंदिरात जाऊन देव दर्शन केलं आहे. तर दुसरीकडे शुद्धिकरण विधीसाठी मंदिर समितीकडून दर्शन बंद करण्यात आले आहे. त्या २ महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यावर सुद्धा टीका करण्यात येते आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x